महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१६ मे महत्वाच्या घटना

१६६५: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू.

१८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.

१८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.

१९२९: हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

१९६९: सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.

१९७५: सिक्कीम भारतात विलीन झाले.

१९७५: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.

१९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

१९९६: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

२०००: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.

२००५: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

२००७: निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

१७३९: मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचा पराभव केल्याने वसईची लढाई संपली.

१६ मे जन्म

१८२५: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १८८४)

१८३१: मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९००)

१९०५: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)

१९२६: गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)

१९३१: भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्म.

१९७०: अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी यांचा जन्म.

१९५०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक जॉर्ज बेडनोर्झ यांचा जन्म

१९४७: भारतीय फील्ड हॉकी खेळाडू - ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न वरिंदर सिंग यांचा जन्म (मृत्यू : २८ जून २०२२)

१९२३: अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक मेर्टन मिलर यांचा जन्म (मृत्यू : ३ जून २००२)

१८८३: तुर्की देशाचे ३रे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी सेलल बायर यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १९८६)

१८५०: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचा जन्म (मृत्यू : ८ एप्रिल १९०६)

१६ मे मृत्यू

१८३०: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १७६८)

१९५०: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८७८)

१९७७: माली देशाचे पहिले अध्यक्ष मादीबो केएटा यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९१५)

१९९०: द मपेट्स चे जनक जिम हेनसन यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)

१९९४: साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन.

१९९४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९११ – फरिदपूर, बांगला देश)

२००८: ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचे निधन. (जन्म: १८ जुन १९१३)

२०१४: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)

२०२२: भारतीय राजकारणी, खासदार आणि महाराष्ट्राचे खासदार हुसेन दलवाई यांचे निधन (जन्म: १६ फेब्रुवारी १९४३)

२०२२: भारतीय अभिनेत्री चेतना राज यांचे निधन

२०१३: स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक हेनरिक रोहरर यांचे निधन (जन्म: ६ जून १९३३)

१९४७: इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स यांचे निधन (जन्म: २० जून १८६१)

१९३८: अमेरिकन अभियंते, गोल्डन गेट ब्रिजचे सह-रचनाकार जोसेफ स्ट्रॉस यांचे निधन (जन्म: ९ जानेवारी १८७०)





  Print






News - todayspecialdays




Related Photos