बल्लारपुरात अवैध रेती वाहतुकीवर धाड : ५ लाखांचा ट्रॅक्टर जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत ट्रॅक्टरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. १४ मे रोजी कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाला बल्लारपूर परिसरात वर्धा नदीतून चोरट्या पद्धतीने गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला असता अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. ५७६/२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९, जमीन महसूल कायदा कलम ४८(७), ४८(८) तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आरोपी विनोद विठ्ठल आत्राम (रा. बल्लारपूर) याच्याविरुद्ध कारवाई केली असून पुनमचंद बहुरिया हा फरार आरोपी असल्याचे सांगण्यात आले. कारवाईदरम्यान ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक MH-३४/BV-२६३२ व एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे व पथकाने केले.
News - Chandrapur




Petrol Price




