महत्वाच्या बातम्या

 भद्रावतीत धुमाकूळ घालणारा बिबट अखेर पिंजऱ्यात जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळविले. गुरुवारी २३ जुलै रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बिबट्याच्या हालचाली लक्षात घेऊन वनविभागाने १८ जुलै २०२६ रोजी गौतम नगर परिसरात पिंजरा लावला होता. त्यानंतर वनविभागाकडून सातत्याने परिसरावर लक्ष ठेवण्यात येत होते. अखेर पाच दिवसांच्या प्रयत्नांनंतर बिबट पिंजऱ्यात अडकल्याने वनविभागाच्या नियोजनाला यश मिळाले.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये क्षेत्र सहाय्यक के. एन. घुगलोत, वनरक्षक एस. पी. पारवे, वनरक्षक मदतनीस यश वराडे, ललित दिलीप नागपुरे, वाहनचालक अनिल सेनद्रे, अमर किनाके, किशोर मडावी, नितीन राऊत, पवन मांडरे, वन कर्मचारी अंबादास शेडमाके, महादेव मडावी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

याशिवाय भद्रावतीचे सर्पमित्र क्षितिज महेशकर, सार्ड संस्था भद्रावतीचे अनुप येरणे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच गौतम नगर परिसरातील नागरिक आणि नगरसेवक जीवतोडे यांनीही वनविभागाला मोलाचे सहकार्य केले.

बिबट सुरक्षितरीत्या जेरबंद झाल्यानंतर वनविभागाने पुढील आवश्यक वैद्यकीय तपासणी व नियमानुसार पुढील कार्यवाही सुरू केली असून, या यशस्वी मोहिमेबद्दल वनविभागाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos