ps.durgapur@nic.in

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संबंधितांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केले आहे.

" /> ps.durgapur@nic.in

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संबंधितांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केले आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी पोलिसांचे आवाहन : ठेवीदारांनी माहिती देण्याचे आवाहन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तुकुम येथील मित्रमंडळी नागरी पतसंस्था मर्यादित (रजि. नं. सि.एच.डी/३५३/२००१) संदर्भात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणी दूर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम (MPID Act) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१६(५), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासादरम्यान काही व्यक्ती व संस्थांनी विविध गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठी रक्कम स्वीकारून फसवणूक केल्याची शक्यता समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व गुंतवणूकदार, ठेवीदार व हितधारकांनी पुढे येऊन तपासात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांनी संबंधित संस्था किंवा व्यक्तींमध्ये गुंतवणूक केली आहे अथवा ज्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, पुरावे किंवा माहिती उपलब्ध आहे, त्यांनी तात्काळ दूर्गापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. गुंतवणुकीच्या पावत्या, करारपत्रे, बँक व्यवहाराचा तपशील, प्रमाणपत्रे आदी कागदपत्रे तपासासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून मिळणारी माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून ती तपास प्रक्रियेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

संपर्कासाठी : दूर्गापूर पोलीस ठाणे, चंद्रपूर (कार्यालयीन वेळेत)
संपर्क क्रमांक : ७८८७८९१००३
ई-मेल : ps.durgapur@nic.in

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संबंधितांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos