गोंदिया : बोंडगावदेवीत घरातच आकस्मिक तरुणाचा मृत्यू : उष्माघाताची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बोंडगावदेवी येथे ३८ वर्षीय जयप्रकाश पंढरी बारसागडे यांचा घरात झोपलेल्या अवस्थेत आकस्मिक मृत्यू झाला. मृतक दारूच्या व्यसनी होता.
२९ एप्रिल ते १ मे दरम्यान, तो आपल्या घरातील लाकडी पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसून न आल्यामुळे आरती गुपचूप बारसागडे (२६) यांनी गावातील नागरिक आणि पोलिस पाटील यांना याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर जयप्रकाश बारसागडे मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासानुसार, मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहायक फौजदार कोडापे करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




