महत्वाच्या बातम्या

 ढाकणी रेल्वे फाटकाजवळ अनोळखी इसमाचा रेल्वेखाली मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील ढाकणी येथील रेल्वे फाटकाजवळ २९ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सुमारे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना गोंदिया–नागपूर रेल्वे मार्गावरील रूळांवर घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती रेल्वे रूळांवर असताना धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अपघाती स्वरूपाची आहे की इतर कोणते कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच गोंदिया रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यासाठी पोलिस हवालदार राऊत प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास गोंदिया रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos