महत्वाच्या बातम्या

 भरधाव वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने तरुण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्राम धोबीसराड परिसरात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रविवारी २६ रात्री सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्यामुळे एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव मुनेश्वर योगराज भोयर (वय ३०, रा. साधूटोला-चिचेवाडा) आहे.

मुनेश्वर भोयर आपल्या दुचाकीने (एमएच ३५-एपी ८८०१) देवरीहून आपल्या गावी जात होता. धोबीसराड परिसरात अचानक अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो रस्त्यावर कोसळला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी देवरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अपघात करणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन केले असून, अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्यासही आग्रह केला आहे.





  Print






News - Gondia




Related Photos