महत्वाच्या बातम्या

 २८ एप्रिल रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पांडूरंग सदाशिव खानखोजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २८ एप्रिल रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

२८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आयोजित रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामवंत कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये प्रामुख्याने मॅकवेल इंजिनिअरींग कंपनी पुणे, यांच्याकडे फक्त पुरुष उमेदवारांसाठी आयटीआय धारक फिटर, ईलेक्ट्रीशियन, वेल्डर, ड्रॉप्समन अभ्यासक्रम धारण केलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

उमेदवारांना १८ हजार रुपये मासिक वेतन असून इन्सेंटीव्ह राहणार आहे. सत्या मायक्रीकॅपीला कंपनीकडे असलेल्या ४० रिक्त पदासाठी २०  हजार रुपये वेतन राहणार आहे. तसेच सहयोग मल्टीस्टेट बँकेकडे असलेली ३० रिक्क पदे भरण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्यात प्रधानमंत्री इंटरशीप योजनेबाबत माहिती देण्यात येणार आहे.

मेळाव्यात एचएससी पास, पदवी व आयटीआय पास उमेदवारांकरीता एकुण ३७० रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांचे १८ ते ४० वर्ष असावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुळ शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रासह मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos