महत्वाच्या बातम्या

 देवरी तालुक्यात २२ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील मुरपार शिवारात शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचा परिचय मुकुंद गणेश वरखडे (वय २२, रा. मुरपार) असे करण्यात आला असून तो मागील चार दिवसांपासून बेपत्ता होता.

प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील मुरपार जंगलातील रान तलाव परिसरात शनिवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास काही गुराख्यांनी ऐनाच्या झाडावर गळफास घेतलेला मृतदेह आढळला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. गुराख्यांनी ही माहिती तातडीने गावकऱ्यांना दिली, तर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गावात या घटनेवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मुकुंदच्या मृत्यूमागे आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अनेक गप्पा होऊ लागल्या आहेत. प्राथमिक तपासानुसार सालेकसा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून तपास सुरू केला. मुकुंद वरखडे हा मंगळवारपासून घरातून बेपत्ता होता. कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्याचा शोध घेत होते. मृतदेह कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले; मात्र कपड्यांवरून आणि प्राथमिक माहितीवरून तो मुकुंद असल्याचे निश्चित करण्यात आले.





  Print






News - Gondia




Related Photos