महत्वाच्या बातम्या

 शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान व मतमोजनी २ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.

या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos