आजचे दिनविशेष


९ एप्रिल महत्वाच्या घटना
१८६७ : रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१९६७ : बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९९४ : सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९५ : लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
२०२४ : इस्रायल-हमास युद्ध - युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठी मानवतावादी मदत, एअरड्रॉपद्वारे उत्तर गाझा पट्टीवर करण्यात आली, नऊ राष्ट्रांतील किमान १४ विमानांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला.
२०२४ : ओरस्क धरण कोसळले - रशिया आणि कझाकस्तानमधील १,००,००० हून अधिक लोकांना उरल नदीच्या बाजूने आलेल्या आपत्तीजनक पुराच्या दरम्यान स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
९ एप्रिल जन्म
१३३६ : मंगोल सरदार तैमूरलंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
१७७० : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.
१८२८ : थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)
१८८७ : पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५०)
१८९३ : बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१९२५ : अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९५)
१९३० : अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.
१९४८ : हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म.
२०२४ : ध्वनी पेक्षा ३ पट वेग (Mach 3) साध्य करणारे पहिले व्यक्ती मिलबर्न जी. ऍप्ट यांचा जन्म (मृत्यू : २७ सप्टेंबर १९५६)
१९०३ : जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १९६७)
१८९९ : मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १९८०)
९ एप्रिल मृत्यू
५८५ : ५८५ इ.स. पूर्व : जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पूर्व ७११)
१६२६ : इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १५६१)
१६९५ : पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.
१९९४ : स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.
१९९८ : महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. (जन्म: २२ जून १९०८)
२००१ : पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)
२००१ : दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२१)
२००९ : हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००९ : लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.
२००१ : तैवानचे राजकारणी आणि चीन प्रजासत्ताकचे उपाध्यक्ष हँसीएच तुंग-मिन यांचे निधन (जन्म: २५ जानेवारी १९०८)
१९०१ : जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचे निधन (जन्म: ९ नोव्हेंबर १८६७)
News - todayspecialdays




Petrol Price




