गोंदिया : धाबेटेकडीतील तरुणाचा विषबाधेमुळे मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्राम धाबेटेकडी येथील तरुणाचा बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास विषबाधेमुळे मृत्यू झाला. मृतकाचे नाव प्रशांत विठोबा परशुरामवार (३७, रा. धाबेटेकडी) आहे.
प्रशांत परशुरामवार नेहमीप्रमाणे मजुरी करून घरी आला आणि जेवण केल्यानंतर त्याला अचानक उलट्या होऊ लागल्या. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत मृत्यूचे कारण विषप्राशन असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
News - Gondia




Petrol Price




