गोंदिया स्थानकावरील पायाभूत कामांमुळे गाड्यांचे रद्दकरण व आंशिक समाप्ती/प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : मध्य रेल्वेकडून कळविण्यात येते की दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या नागपूर विभागांतर्गत गोंदिया स्थानकावरील लाईन क्र. ०५ (प्लॅटफॉर्म क्र. ३) वर असलेला वॉशेबल एप्रन काढून त्याचे बॅलेस्टेड ट्रॅकमध्ये रूपांतर करण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कामामुळे खालील गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे:
गाड्यांचे रद्दकरण -
गाडी क्र. १८०३३० शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
(शालीमारहून सुटणारी) ०४ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस
(लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी) ०६ एप्रिल २०२६ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १८२३७ कोरबा – अमृतसर एक्सप्रेस
(कोरबाहून सुटणारी) ०५ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १८२३८ अमृतसर – बिलासपूर एक्सप्रेस
(अमृतसरहून सुटणारी) ०७ एप्रिल २०२६ ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १२४१० हजरत निजामुद्दीन – रायगड एक्सप्रेस
(हजरत निजामुद्दीनहून सुटणारी) ०२ एप्रिल २०२६ ते २१ एप्रिल२०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १२४०९ रायगड – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
(रायगडहून सुटणारी) ०४ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस
(लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी) ०४ एप्रिल २०२६ते 21 एप्रिल 2026 दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १२१०२ शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
(शालीमारहून सुटणारी) ०६ एप्रिल २०२६ ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १२८०७ विशाखापट्टणम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
(विशाखापट्टणमहून सुटणारी) ०५ एप्रिल २०२६ ते २३ एप्रिल २०२६दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. १२८०८ हजरत निजामुद्दीन – विशाखापट्टणम एक्सप्रेस
(हजरत निजामुद्दीनहून सुटणारी) ०७ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. ६८८१५ बल्लारशाह – गोंदिया मेमू पॅसेंजर
०५ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
गाडी क्र. ६८८१६ गोंदिया – बल्लारशाह मेमू पॅसेंजर
०५ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान रद्द राहील.
आंशिक समाप्ती / प्रारंभ -
गाडी क्र. ६८८०२ गोंदिया – बल्लारशाह
गाडी क्र. ६८८०३ बल्लारशाह – गोंदिया
गाडी क्र. ६८८०४ गोंदिया – बल्लारशाह
वरील गाड्या ०५ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान हिरदमाली स्थानकापर्यंतच आंशिक समाप्त/प्रारंभ करण्यात येतील. प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, ही विनंती.
News - Gondia




Petrol Price




