नकली दागिने विकून सराफा व्यवसायिकाची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील एका सराफा व्यवसायिकाला नकली दागिने देऊन फसवणुकीची घटना बुधवारी २५ दुपारी सुमारे ३:३० वाजता उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील सराफा बाजारातील तारसेवाला ज्वेलर्स मध्ये बुधवारी दुपारी एका महिलेने काही दागिने विक्रीसाठी आणली. महिलेने ती दागिने सोन्याचे असल्याचे सांगून दुकानदाराला विक्री केली आणि नंतर त्या ठिकाणावरून निघून गेली.
तपासणीदरम्यान, दुकानदाराला हे दागिने नकली असल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित महिलेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्यावरून तिचा शोध सुरू केला आहे.
स्थानिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तीकडून दागिने खरेदी करण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिस या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्यास सज्ज आहेत.
News - Gondia




Petrol Price




