महत्वाच्या बातम्या

 मध्यपूर्वेतील संघर्षाचा नवा टप्पा : ऊर्जा केंद्रांवर हल्ले, जागतिक बाजारावर तणाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / दुबई/तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष आता २० दिवस पूर्ण करून धोकादायक वळण घेतला आहे. सुरुवातीला फक्त लष्करी तळ आणि राजकीय नेत्यांवर केंद्रित हल्ले आता थेट देशांच्या ऊर्जा स्रोतांवर (ऑइल-गॅस फील्ड्स) होत आहेत. त्यामुळे हा संघर्ष फक्त लष्करी न राहता आर्थिक युद्धात परिवर्तित झाला आहे.

युद्धाचे बदलते स्वरूप -
सुरुवातीला इराणमधील सत्ताकेंद्रे, लष्करी तळ आणि राजकीय नेतृत्वावर हल्ले करण्यात आले. नंतर संघर्ष समुद्रात पोहोचला आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात जहाजांवर हल्ले झाले. आता युद्धाचा फोकस थेट ऊर्जा पायाभूत सुविधांवर गेला असून, जागतिक अर्थव्यवस्थेस गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले -
१. खर्ग द्वीप (इराण) – अमेरिकेचा हल्ला
इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेने हल्ला केला. या बेटावरून इराणच्या जवळपास ९०% कच्च्या तेलाची निर्यात होते.

२. साउथ पार्स गॅस फील्ड (इराण) – इस्रायलचा हल्ला
जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या या ठिकाणी इस्रायलने हल्ला केला. इराणच्या घरगुती गॅस पुरवठ्याचा ७०% भाग याच ठिकाणावर अवलंबून आहे. हल्ल्यानंतर मोठी आग लागली असून, कतर आणि यूएईने तीव्र टीका केली आहे.

३. रास लाफान (कतर) – इराणचा प्रत्युत्तर हल्ला
जगातील सर्वात मोठा LNG (लिक्विफाइड नॅचरल गॅस) हब असलेल्या रास लाफानवर इराणने हल्ला केला. कतरकडे जागतिक सुमारे १०% गॅस साठा असून, या हल्ल्यामुळे पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

४. रुवैस रिफायनरी (अबू धाबी) – इराणचा ड्रोन हल्ला
जगातील चौथी सर्वात मोठी सिंगल-साइट रिफायनरी असलेली रुवैस रिफायनरी इराणच्या ड्रोन हल्ल्यात नुकसानाला सामोरे गेली. सुरक्षेच्या कारणास्तव कामकाज तात्पुरते थांबवले गेले आहे.

५. रास तनुरा रिफायनरी (सौदी अरेबिया) – इराणचा हल्ला
मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या रिफायनरीजपैकी एक असलेल्या रास तनुरावर इराणने ड्रोन हल्ला केला. याची उत्पादन क्षमता ५.५ लाख बॅरल प्रतिदिन असून, हल्ल्यानंतर कामकाज तात्पुरते थांबवले गेले आहे.

आर्थिक युद्धाची सुरुवात -
ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युद्धाचे स्वरूप बदलले आहे. तेल आणि गॅस उत्पादनावर परिणाम, जागतिक पुरवठा साखळीवर दबाव आणि इंधन दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसर असुरक्षित झाल्यास, जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.





  Print






News - World




Related Photos