महत्वाच्या बातम्या

 इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष तीव्र : पाचव्या युद्धनौकेवर हल्ला, लेबनानमधील हॉटेल निशाणावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. इराणी लष्कराने बहरीनमध्ये तैनात अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर हवाई हल्ला केला, ज्यात २१ सैनिक मारले गेले असल्याचा दावा इराणी लष्करी दलाने केला आहे.

इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना पलटवार करत युद्धनौकेवर बॉम्ब वर्षाव केला. अमेरिकेच्या नौदलाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहेत आणि संघर्ष क्षेत्रातील अमेरिकन नागरिकांना माहिती व मदत पुरवण्यासाठी काम करत आहेत. नागरिकांनी सावध राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे.

त्याचबरोबर, इस्रायलने लेबनानच्या राजधानी बेरूतमधील एका हॉटेलवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले आहेत. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानुसार, हॉटेल युद्धामुळे बेघर झालेल्या लोकांच्या तात्पुरत्या निवासासाठी वापरले जात होते. इस्रायली लष्कराने हल्ला अचूक असल्याचे सांगितले आणि त्याचा निशाणा कुद्स फोर्सचा मुख्य कमांडर होता, असे स्पष्ट केले.

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोरने (IRGC) म्हटले आहे की, त्यांचे सशस्त्र सैन्य पुढील सहा महिने युद्ध सुरू ठेवण्यास सक्षम आहे. फार्स न्यूजने दिलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत वापरलेल्या मिसाईल्स सुरुवातीला विकसित केलेल्या होत्या, परंतु आता इराण अत्याधुनिक आणि दूरपर्यंत मार करणाऱ्या मिसाईल्सचा वापर करणार आहे.

संघर्षाची तीव्रता वाढत असून, आंतरराष्ट्रीय समुदाय चिंता व्यक्त करत आहे.





  Print






News - World




Related Photos