आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या स्थानिक आमदार निधीतून वेंकटापूर येथे नवीन हातपंपाचे उदघाटन


- गावात पाणी समस्या दूर होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सिरोंचा : ग्रामपंचायत वेंकटापूर अंतर्गत वेंकटापूर गावात पाणी समस्या असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधून स्थानिक आमदार निधीतून वेंकटापूर येथे नवीन हातपंप बनवले.
ऐन उन्हाळ्यात हात टाकल्याने पाण्याची समस्या दूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, सरपंच अजय आत्राम, प्रतिष्टीत नागरिक किष्टय्या मडावी, रोहन अल्लूरी, श्रीनिवास घोडाम, येर्राय्या मडावी, हणमंतू मडावी, संतोष मडावी, परशुराम मडावीसह वेंकटापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




