कृत्रिम बुद्धिमत्ता हा धोका नसून मोठा बदल आणि संधी : डॉ. के.टी. किरणापुरे यांचे प्रतिपादन


- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आरमोरी येथे विविध स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : मराठी विज्ञान परिषद शाखा-आरमोरी व वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रामण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जव्हेरी विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथील प्राचार्य डॉ. आशिषजी सेलोकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. के.टी. किरणापुरे होते. सत्कारमूर्ती म्हणून ग्रामगीताचार्य चेतन मारोतराव ठाकरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून डी.टी. किरणापुरे, चारुदत्त राऊत (अध्यक्ष, स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोली), नितीन कासार (मुख्याध्यापक), रजनी किरणापुरे, प्रणाली गारोदे, सुजाता अवचट, मीनाक्षी कासार व अमित राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गुलनाज शेख यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. के. टी. किरणापुरे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हा धोका नसून तो एक मोठा बदल आणि नवी संधी आहे. योग्य दिशेने वापर केल्यास AI मानवजातीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले. तसेच डॉ. आशिष सेलोकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे संशोधनात्मक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहन केले.
या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता : शाप की वरदान? या विषयावरील निबंध स्पर्धेत योगिता सोमेश्वर जुआरे (महात्मा गांधी कन्या विद्यालय, आरमोरी) हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक रेणु मुखरु देशमुख (पराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल) तर तृतीय क्रमांक प्रतिज्ञा प्रकाश ढोरे (महात्मा गांधी कन्या विद्यालय, आरमोरी) हिला मिळाला.
वैज्ञानिक प्रतिकृती स्पर्धेत दिशीता विरेंद्र मने हिने प्रथम, रोहन सुभाष ईटनकर द्वितीय व वेदांत विश्वास सहारे तृतीय क्रमांक मिळविला. गणित प्रतिकृती स्पर्धेत केतकी महादेव माकडे प्रथम, मानसी राजेश हेडाऊ द्वितीय व मानवी मनीष कत्रे तृतीय ठरल्या. सर्व विजेते विद्यार्थी वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर येथील आहेत.
यावेळी वेदांत विश्वास सहारे व कृष्णाकुमार रूपलाल धिहारी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता : क्षमता आणि चिंता या विषयावर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरेश बावनकर, बालकदास कोटरंगे व जयश्री सोनकर यांनी विशेष सहकार्य केले.
News - Gadchiroli




Petrol Price




