सिंदी रेल्वे येथील वन जमीनीवरील ८२ घराचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पुर्ण


- वन विभाग व पोलिस विभागाच्या ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली कार्यवाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : गेल्या अनेक वर्षापासून सिंदी रेल्वे येथील मौजा परसोडी शिवारात वन विभागाच्या सर्वे नंबर २६, २७ व २८ वरील ३ हेक्टर जमिनीवर ८२ कुटूंबांनी अतिक्रमण करुन कच्चे व पक्के घराचे बांधकाम केले होते. आज वन विभागाने पोलिस विभागाच्या मदतीने कायदेशिर कार्यवाही करुन ८२ घराचे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण केली.
आज सकाळी ७ वाजता पासून सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे व माधव आडे यांच्या मार्गदर्शनात १३० वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलिस विभागाच्या ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात कार्यवारी करण्यात आली.
कार्यवाही दरम्यान कुठलीही अनुचित घटना न घडता शांततेत कार्यवाही पार पडली. सेलूच्या तहसिलदार शंकुतला पाराजे, सिंदीचे नायब राजेंद्र मंथनवार तहसिलदार यांची उपस्थिती होती.
News - Wardha




Petrol Price




