आलापल्ली मार्गावर वाहनांच्या धडकांमुळे वन्यजीवांचा बळी : धन्नूर गावाजवळ चितळाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / आष्टी : आलापल्ली मार्गावर वाहनांच्या वेगामुळे वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २२ फेब्रुवारी रोजी धन्नूर गावाजवळ अज्ञात वाहनाने एका चितळाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे तो जागीच मृत्यू झाला. या मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी अधिक संरक्षणात्मक उपायांची आवश्यकता आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनांच्या वाढत्या वेगामुळे वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकपणे वाढले आहे. वन्यजीव संरक्षणासाठी तातडीने गती मंद करणारे गतिरोधक बसवणे, स्पीड लिमिट फलक लावणे आणि रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उपाययोजनांच्या अभावामुळे वनसंपदेचा ऱ्हास होण्याची स्थिती आहे.
आलापल्ली मार्गावर वन्यजीवांचे जीवन धोक्यात असताना, भविष्यात अधिक मोठ्या वन्यजीवांचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी लगाम ते चौडमपल्ली मार्गावर १८ फेब्रुवारी रोजी एका नितळाचा मृत्यू वाहनाच्या धडकेमुळे झाला होता.
स्थानिक वनविभाग आणि प्रशासनाने यावर गंभीरपणे विचार करून तातडीने उपाययोजना घ्याव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




