महत्वाच्या बातम्या

 यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून कलागुणांची उधळण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : श्री संताजी समाजसेवा प्रतिष्ठान द्वारा संचालित यशवंत कला कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव येथे ५ व ६ जानेवारी २०२३ ला दोन दिवसीय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत झिमटे उद्घाटक म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक जुआरे विद्यार्थी पालक प्रतिनिधी म्हणून दामोदर राऊत प्रा. साधना कन्नाके, स्वप्नील कुकरकर इत्यादी उपस्थित होते. 

प्रस्ताविकेतून बोलताना प्राचार्य प्रशांत झिमटे म्हणाले की, शिक्षणा सोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळनेही तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की, अंगी असू दे एक तरी कला नाही तर काय फुका जन्मला या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दडलेले सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी आपल्या महाविद्यालयात स्नेह संमेलन आयोजन करण्यात येत असतात. यातूनच विद्यार्थी आपल्या कलागुणांना सादर करतात. पुढे चालून येथूनच अनेक कलावंत पुढे आल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून आपल्या शैक्षणिक बाबीवरही लक्ष केंद्रित करावे आणि अशा होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये हिरीरीने सहभाग दर्शवावा सदर कार्यक्रमांमध्ये एकल नृत्य, समूह नृत्य, काव्यवाचन, गीत गायन, विविध अंधश्रद्धा दूर करणाऱ्या नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर केल्या जाणार आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहनही या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा सहारे, प्रास्ताविक तेजस्विनी राऊत तर आभार अमर मडावी यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos