लगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल


- प्रकरण उघडकीस आल्याने पालक संतप्त 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेच्या शिक्षकाने  आश्रमशाळेतीलच एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संतप्त पालकांनी सबंधित शिक्षकाला बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी संस्थापकाला घेराव घातला.  पिडीत मुलीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षक प्रणब मंडल याच्याविरूध्द भादंवी २०४, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम तसेच अॅटासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
प्रणब मंडल असे त्या शिक्षकाचे नाव  असून  ९ ऑक्टोबर रोजी पिडीत मुलीच्या मैत्रीणीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी तिला सोबत म्हणून पिडीत मुलीला शिक्षक प्रणब मंडल याच्यासोबत मुख्याध्यापकांनी पाठविले. शिक्षक मंडल याने पिडीत व आजारी असलेल्या मुलीचे कपडे विसरल्याचे कारण समोर करून कपडे आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगून स्वतःच्या दुचाकीवर बसवून घेवून गेला. आश्रमशाळेपासून काही अंतरावर गेल्यानंतर त्याने पिडीत मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 
ही बाब पिडीत मुलीने कोणाजवळही सांगितली नाही. मात्र  अनावर झाल्याने मुलीने मुख्याध्यापक दुधबावरे यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. याबाबत मुख्याध्यापक दुधबावरे यांनी संस्थापकांना या बाबीची माहिती दिली. संस्थापकाने सबंधित शिक्षकास निलंबित करून स्थानांतरण करणार असल्याचे सांगितले. दरम्यान ही बाब लगाम येथील सरपंचा मनिष मारटकर व चुटूगुंटाचे सरपंच सुधाकर नैताम यांच्या कानावर पडली. त्यांनी लागलीच उपसरपंच सिडाम यांच्यासह शाळा गाठून मुख्याध्यापकास जाब विचारला. १५ आॅक्टोबर रोजी या बाबीची शहनिशा करून मुख्याध्यापकाने घडलेली हकीकत सांगितली. यावेळी मुख्याध्यापकांनी शिक्षकावर कारवाई सुध्दा केली असल्याचे  सांगितले. हा प्रकार इथेच न थांबता सरपंचांनी संस्थापकांना आमच्या समोर बोलावून प्रकरणाची शहनिशा करा, अशी मागणी केली. यानंतर संस्थापक बबलु हकीम हे शाळेत दाखल झाले. यावेळी शिक्षक मंडल याला बोलावून जाब विचारण्यात आला. यावेळी शिक्षक  मंडल हा प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करून खाली कोसळला. यामुळे उपस्थित काही शिक्षकांनी त्याला लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर प्रकृती गंभीर असल्याचे सांगून शिक्षकाला चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. 
संस्थापकांनी सदर प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज १७ आॅक्टोबर रोजी आश्रमशाळेत बैठकीचे आयोजन केले. यावेळी लगाम, कांचनपूर, त्रिमाळी, लागामचेक, चुटूगुंटा, धन्नूर, कोठारी, दामपूर, षांतीग्राम, काकरगट्टा, मरपल्ली, मच्छीगट्टा, येल्ला, नागुलवाही, बोरी, रेंगेवाही, तुमरगुंडा, आष्टी, बोरी, राजपूर पॅच अषा विविध गावातील षेकडो पालकांनी हजेरी लावली. पालकांनी आत्ताच्या आत्ता मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या शिक्षकास बडतर्फ करा व फौजदारी गुन्हा दाखल करा या मागणीसाठी संस्थापकास घेराव घातला. पालकांचा रोष पाहून संस्थापक हकीम यांनी अहेरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक होडगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील यांच्यासह त्यांची चमु शाळेत दाखल झाली. यावेळी पालकांचे म्हणणे ऐकून घेत पुढील कारवाईसाठी पिडीत विद्यार्थिनीस अहेरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा भारती इष्टाम, महिला प्रदेशाध्यक्षा सुवर्णा वरखडे, पारंपारिक गोटूल समिती सल्लागार संतोष सोयाम, उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीचे सदस्य सुधाकर नैताम, लगामचे  आवीसचे युवा सरपंच मनिष मारटकर, उपसरपंच देवाजी सिडाम, तालुकाध्यक्ष कालिदास कुसनाके, षहर अध्यक्ष अरूण मडावी, महिला शहर अध्यक्षा सुरेखा सिडाम, पोलिस पाटील गिरमा मडावी, दिवाकर वेलादी, सत्यवान सिडाम, यषवंत मडावी, दिवाकर उराडे, दीपक मडावी, बसंत कोवे, नानाजी बुरमवार, दिवाकर सिडाम, अमित मुजूमदार, संजय आत्राम यांनी पिडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहिपर्यंत शिक्षकावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पिडीत मुलीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षक प्रणब मंडल याच्याविरूध्द भादंवी २०४, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम तसेच अॅटासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-18


Related Photos