लग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या


वृत्तसंस्था / पुणे : लग्न जुळत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना  खेड तालुक्यातील डेहणेतील येथे घडली  आहे. 
रंजन  भोपळे (४०)  आणि शैला भोपळे (३८)  असे आत्महत्या केलेल्या बहीण-भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील डेहणेगाव येथे राहत्या घरी विषारी औषध पिऊन  रंजन भोपळे  आणि शैला भोपळे यांनी आत्महत्या केली. दोघेही डेहणेगाव येथे एकत्र राहत होते.  काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई - वडिलांचे निधन झाले. रंजनचा विवाह झाला असून त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. रंजनला दुसरा विवाह करायचा होता तसेच बहीणदेखील अविवाहित होती, पण तिचा विवाह जुळत नव्हता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे.    Print


News - Rajy | Posted : 2018-10-18


Related Photos