महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : २४-२५ फेब्रुवारीला हलक्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये चिंता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात आगामी २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात सोमवारपासून हवामानात अचानक बदल होणार असून, आकाश ढगाळले राहील.

सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. अनेक ठिकाणी तूर, लाकोरी, उडीद आदी पिके काढणीच्या टप्प्यात आहेत. या पिकांची काढणी सुरू असताना पावसामुळे त्यांची गुणवत्ता आणि संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपत्कालीन उपाययोजना हवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, प्रशासनाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेत शेतकऱ्यांना मदतीसाठी सूचना व मार्गदर्शन सुरू केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos