महत्वाच्या बातम्या

 पुणे-नागपूर मार्गावर सहा विशेष रेल्वे गाड्यांची सोडत, प्रवाशांना दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे विभागाने पुणे आणि नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वे गाड्यांची सोडत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे-नागपूर सुपरफास्ट विशेष गाड्या -

१. गाडी क्रमांक ०१४६७
पुणे येथून १३ आणि २० फेब्रुवारीला दुपारी ३:५० वाजता सुटेल, आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता पोहोचेल.

२. गाडी क्रमांक ०१४६८
नागपूर येथून १४ आणि २१ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता सुटेल, आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता पोहोचेल.

३. गाडी क्रमांक ०१४१९
पुणे येथून १८ फेब्रुवारीला दुपारी ३:३० वाजता सुटेल, आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता पोहोचेल.

४. गाडी क्रमांक ०१४२०
नागपूर येथून १९ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता सुटेल, आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता पोहोचेल.

गाड्यांच्या थांब्यांचा तपशील -
या गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा अशा स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या विशेष रेल्वे गाड्यांच्या सोडण्यामुळे पुणे आणि नागपूर दरम्यानच्या प्रवासाच्या सोयीला मोठा हातभार लागणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos