सहाय्यक गट विकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी नानोटे यांचे अपिलार्थी यांना ७ दिवसाचे आत विनाशुल्क माहिती देण्याचे आदेश


- माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत दणका
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील ग्रामपंचायत अधिकारी, सचिव व जनमाहिती अधिकारी सौ. वर्षाराणी आशिष कोलते यांना अर्जदार अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी (रा. कुर्ली ता. घाटंजी) यांना ०७ दिवसांचे आंत विनामूल्य माहिती देण्याचे आदेश घाटंजी पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी वंदना दिगांबर नानोटे यांनी दिले आहे. आदेशाची प्रत राज्य माहिती आयुक्त अमरावती यांना पाठविण्यात आली आहे.
या मुळे घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये खळबळ माजली आहे. कुर्ली येथील अपिलकर्ता अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी, कुर्ली यांनी पंगडी येथील जन माहिती अधिकारी, सचिव व ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पंगडी वर्षाराणी आशिष कोलते यांचे कडे अर्ज करुन क्लीन मॅक्स सोलर कंपनी सह इतर सात मुद्यांवर माहिती मागितली होती. परंतु, जन माहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत पंगडी वर्षाराणी आशिष कोलते यांनी अर्जदार अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांना कोणतीही माहिती दिली नाही वा पुरविली नाही. तसेच साधे पत्र सुद्धा पाठवले नाही.
तदनंतर अपिलकर्ता अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी (रा. कुर्ली ता. घाटंजी) यांनी घाटंजी पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी वंदना दिगांबर नानोटे यांचे कडे प्रथम अपिल दाखल केले. प्रथम अपिल प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबर २०२५ रोजी ठेवण्यात आली होती. परंतु, प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती, घाटंजी वंदना नानोटे यांची मा. जिल्हाधिकारी यांचे कडे कार्यालयीन कामकाजा बाबत बैठक असल्याने सदरची सुनावणी १७ डिसेंबर २०२५ रोजी ठेवण्यात आली.
प्रथम अपिल प्रकरणात ग्रामपंचायत पंगडी (ता. घाटंजी) येथील अंतर्गत सुरु असलेल्या सोलर कंपनीचे अस्तीत्वात असलेल्या किंवा संबंधित विषयाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत पंगडी येथे उपलब्ध असलेली माहिती जन माहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पंगडी यांनी आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांचे आंत अर्जदार अयनुद्दीन शमसुद्दीन सोलंकी, कुर्ली यांना माहिती प्रदान करावे, असा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
एकंदरीत माहिती अधिकार कायदा - २००५ अंतर्गत सदर आदेश पारित झाल्याने घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये खळबळ उडाली आहे.
News - World




Petrol Price




