नायलॉन मांजाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश, विक्रेते आणि वापरकर्त्यांवर मोठा दंड


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्राणघातक नायलॉन मांजाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी या संदर्भात न्यायालयाने नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर अडीच लाख रुपये आणि वापरणाऱ्यांवर ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची सूचना विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली.
न्यायालयाचा निर्णय -
न्यायालयाने २०२१ मध्ये नायलॉन मांजाविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्तीद्वय अनिल यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने २०२१ पासून परिस्थितीमध्ये कोणताही सकारात्मक बदल घडलेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि विक्रेतेांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जाहीर नोटीस आणि सुनावणी -
न्यायालयाने या कारवाईपूर्वी संबंधितांना सुनावणीची संधी देण्यासाठी २७ डिसेंबर रोजी सर्व वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर अडीच लाख रुपये आणि वापरणाऱ्यांवर ५० हजार रुपये दंड ठोठावला जाऊ नये का, याची विचारणा करावी, असे निर्देश दिले आहेत. आक्षेप घेतल्यास संबंधितांनी ५ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांवरही कारवाई -
न्यायालयाने पोलिसांनाही जबाबदार धरले असून, नायलॉन मांजामुळे ज्या ठिकाणी अनुचित घटना घडतील, त्या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत. या संदर्भात पोलिस उपायुक्त आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांना २९ डिसेंबरपर्यंत सूचना देण्यात याव्यात.
नायलॉन मांजाची विक्री -
राज्याच्या पर्यावरण विभागाने १ मार्च २०२३ रोजी नायलॉन मांजावर बंदी घातली होती, परंतु या बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने त्याची विक्री सध्या देखील सुरू आहे. यामुळे वाहनचालक, जनावरे आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. न्यायालयाने नायलॉन मांजा बंदीसंदर्भात कटाक्षाने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यवाहीचा संदेश -
न्यायालयाच्या या निर्णयामुळे नायलॉन मांजाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाच्या भूमिका आणखी कठोर होईल. अॅड. निश्चय जाधव (न्यायालय मित्र) यांनी चंद्रपूर मनपातर्फे अॅड. महेश धात्रक आणि नागपूर मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांचे कामकाज पाहिले.
News - Nagpur




Petrol Price




