महत्वाच्या बातम्या

 लग्न जुळवण्याच्या आमिषाने पाच लाख रुपयांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सांगली : लग्न जुळवून देतो, असे सांगून दोन कुटुंबांची एकूण पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनाजी शिवाजी कदम (वय ६०, व्यवसाय शेती, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी १८ ते २० मार्च २०२५ या कालावधीत कौठुळी, दिघंची आणि शीतलादेवी मंदिर, बारड येथे हा प्रकार घडल्याचे सांगितले. आरोपी धनाजी भीमराव शिंदे व पोलू शंकर गिरी यांनी संगनमत करून फिर्यादीस त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहून लग्न लावून देतो, असे आश्वासन दिले.

त्यांनी आरती नावाची मुलगी शीतलादेवी मंदिरात आणून लग्न ठरल्याचा देखावा करून २ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, लग्न होण्याआधीच मुलगी निघून गेली. यानंतर, आरोपींनी फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्यापासूनही २ लाख ५० हजार रुपये घेतले, परंतु संबंधित मुलगी सासर सोडून गेली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, फिर्यादी धनाजी कदम यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी १५ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून, एकूण फसवणूक रक्कम पाच लाख रुपये आहे. पुढील तपास आटपाडी पोलिस करीत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos