महत्वाच्या बातम्या

 वाकुर्डे बुद्रुक येथे उसाच्या फडात आग लागली : शेतकरी भावांपैकी एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सांगली : वाकुर्डे बुद्रुक गावात शनिवारी, १३ ऑक्टोबर रोजी उसाच्या फडातून आग लागली. आग दुसऱ्या शेतात पसरू नये म्हणून प्रयत्न करताना दोन सख्ख्या वृद्ध शेतकरी भावांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

मृतक आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) आणि जखमी वसंत रामचंद्र मोरे (वय ७५) हे दोघे भाऊ आपल्या शेतातील पाला पेटवण्यासाठी गेले होते. दुपारी चार वाजता फड पेटविल्यानंतर वसंत मोरे फडातून बाहेर पडत होते. त्याचवेळी जोरदार वारा वाहू लागल्याने आग भडकली, ज्यामुळे वसंत मोरे यांना तोंड, हात आणि पायावर गंभीर भाजले. त्यांनी आरडाओरडा केल्याने गोरख माने आणि अन्य लोकांनी त्यांना वाचवले आणि शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर आनंदा मोरे यांचा शोध घेतला असता, रविवारी सकाळी त्यांच्या सायकल शेताच्या बाजूला उभी आढळली. शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह शेतात आढळला.

आनंदा मोरे यांच्या पत्नी काही वर्षांपूर्वी मृत झाल्या होत्या आणि त्यांना अपत्य नसल्यामुळे ते वसंत मोरे यांच्याबरोबर राहत होते. या घटनेची माहिती शरद रामचंद्र मोरे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पेटकर पुढील तपास करत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos