महत्वाच्या बातम्या

 खडका शिवार आंतरराज्यीय निम्न पैनगंगा प्रकल्पातील ५३ संशयित आरोपींचा तात्पुरता जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून मंजूर


विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : (NIMNA PAINGANGA PROJECT at TADSAWLI / KHADKA) आर्णी तालुक्यातील खडका शिवार येथील आंतरराज्यीय निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू असतांना धरण विरोधी संघर्ष समिती व इतर परिसरातील गावकऱ्यांनी बेकायदेशीर जमाव करून, दहशत निर्माण करुन, शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ५७ संशयित आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ६१६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहीता कलम १३२, १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३२४ (५), ३२९ (५) सह कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, सह कलम ७ फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, सदर प्रकरणातील ५३ संशयित आरोपींनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तथापि, सदर प्रकरणात शुक्रवारी सुनावणी झाली. यात तत्कालीन जिल्हा सरकारी वकील ॲड. पी. व्ही. गाडबैले, ॲड. अजय डाखोरे व ॲड. निलेश चवरडोल (घाटंजी) आदींनी न्यायालयात युक्तीवाद केला. संशयित आरोपी विजय राऊत सह ५३ संशयित आरोपींनी ॲड. अजय डाखोरे यांचे मार्फत अटकपूर्व जामीनासाठी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सदर प्रकरणात पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी (POLICE INSPECTOR HEMANT CHAUDHARI) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजानन बास्टेवाड (Police Sub Inspector GAJANAN BASTEWAD) पुढील तपास करीत आहे.

फिर्यादी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे उप अभियंता श्यामसुंदर प्रल्हादराव टेंभरे (५३, आर्णी ह. मु. रा. कोल्हे ले आऊट, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून पारवा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल देवानंद बनसोड यांनी सदरचा गुन्हा कायम केला आहे. या मुळे निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी संघर्ष समितीत व इतर गावातील संशयित आरोपी मध्ये खळबळ माजली होती.





  Print






News - Rajy




Related Photos