नागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
  नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचे  शिक्षण घेत असलेल्या  एका १९  वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्टीतील मजकूर वाचून सर्वानाच धक्का बसला आहे.    सौरभ यशवंत नागपूरकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे  नाव आहे.सौरभ हा प्रियदर्शिनी भगवती महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.  काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघाती मृत्यू पाहिल्यानंतर तणाव असह्य झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं सौरभने चिट्ठीत नमूद केले आहे. 
सौरभ याचे  वडील यशवंत हे  एनसीसीमध्ये अधिकारी असून त्याला एक बहीणही आहे. आईवडील घरी नसताना सौरभने गळफास घेऊन आत्महत्या केली. सौरभने त्याच्या सुसाईड नोटमध्ये काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघातात मृत्यू होताना पाहिल्याचं म्हटलं आहे. त्या घटनेपासून चिमुकल्याचा आत्मा मला बोलावतो. त्यामुळेच त्याला भेटण्यासाठी जात असल्याचं कारण त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे मुलाच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2018-10-16


Related Photos