तेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग


वृत्तसंस्था / विशाखापट्टणम :  आंध्र प्रदेशच्या दंबारीकुडा भागात रविवारी दुपारी माओवाद्यांनी तेलगु देसम पार्टीच्या दोन नेत्यांची गोळया झाडून निघृर्ण हत्या केली. आजी-माजी आमदारांच्या हत्येनंतर येथे तणावाचे वातावरण आहे. आपल्या नेत्यांची हत्या झाल्यामुळे समर्थकांनी डुंबरीगुडा पोलीस ठाण्याला आग लावली. तर दुसरीकडे या हल्ल्या प्रकरणी आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसफ, एसओजी आणि सीरपीफ यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी आमदार सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची हत्या केली होती. सर्वेश्वरा राव यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. सीपीआय माओवादी स्थापना दिनाचा कार्यक्रम सुरु असताना या हत्या करण्यात आल्या. माओवाद्यांनी आठवडाभर २७ सप्टेंबरपर्यंत स्थापना दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. किदारी सर्वेश्वरा राव यांनी वायएसआरसीपीच्या तिकिटावर अराकूमधुन आमदारकीची निवडणूक जिंकली पण नंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला. किदारी सर्वेश्वर राव आणि सिवरी सोमा हे दंबारीकुडाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.   किदारी राव यांच्यावर बेकायद खाणकामाला प्रोत्साहन दिल्याच आरोप होता. बॉक्साईटच्या खाणकामाला पाठिंबा दिल्याबद्दल याआधी त्यांना माओवाद्यांनी धमकी सुद्धा दिली होती. मागच्या काही दिवसांपासून माओवादी या दोघांच्या मागावर होते. त्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  Print


News - World | Posted : 2018-09-24


Related Photos