देवीनिमगाव येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / बीड : पैठण ते बारामती रोडवरील देवीनिमगाव येथील पवणे वस्तीवर सोमवारी रात्री आठ वाजता दुचाकीस्वाराच्या कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकाचे नाव संदिप विश्वनाथ अनारसे (वय ४०) असून, तो आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील रहिवासी होता.
सोमवारी रात्री संदिप काम आवरून घरी जात असताना, धामणगांव कडून कड्याकडे येत असलेल्या मालवाहतूक कंटेनरसोबत त्याची समोरासमोर धडक झाली. या धडकेत संदिप गंभीर जखमी झाला आणि त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटना घडत असताना संदिपने घरच्यांना कॉल करून सांगितले होते, कड्यावरून निघालोय, दहा मिनिटात घरी येतो! आणि तो घरी एक मिनिटांच्या अंतरावर होता. या सुदैवी क्षणी त्याला काळाने धोका दिला आणि अपघाताने त्याचे जीवन संपले.
अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके आणि तुषार मिसळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहावर कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. संदिपच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली असून, त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे.
संदिपच्या अचानक निधनामुळे देवीनिमगाव आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या घरापासून अवघ्या एक मिनिटाच्या अंतरावर ही घटना घडली, जेनेकरून गावातील नागरिक खूपच भावुक झाले आहेत.
News - Rajy




Petrol Price




