महत्वाच्या बातम्या

 मध्यप्रदेश हॉकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा शहीद : छत्तीसगड सीमेजवळ नक्षलवाद्यांशी चकमकीत बलिदान


- गोंदिया -  छत्तीसगड सीमेजवळ कंघुराच्या जंगलात पोलीस-नक्षलवादी चकमकीत मध्यप्रदेश हॉकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक शहिद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : छत्तीसगड राज्याच्या सीमा जवळ असलेल्या बोरतलाव पोलीस स्टेशन अंतर्गत कंघुराच्या घनदाट जंगलात बुधवारी मध्यप्रदेश हॉकफोर्स आणि माओवादी गट यांच्यात झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा शहीद झाले. एमएमसी (महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड) झोनमध्ये माओवादी कार्यप्रणालीचा मागोवा घेत गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त शोधमोहिम सुरू केली होती, त्याचे नेतृत्व पोलीस उपनिरिक्षक शर्मा करीत होते.

शर्मा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मोहिमेतील हल्ला -
कंघुराच्या जंगलात सुरू असलेल्या या मोहिमेच्या दरम्यान, माओवाद्यांनी लपून बसून अचानक गोळीबार सुरू केला. शर्मा यांनी त्वरित त्याला प्रतिकार केला, परंतु गोळीबारात त्यांचे हात, पाय आणि पोटावर गोळ्या लागल्या. त्यांना लगेच डोंगरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती राजनांदगांव पोलीस महानिरिक्षक अभिषेक शांडिल्य यांनी दिली.

शोधमोहिम तेज -
घटनास्थळी राजनांदगांव पोलीस अधिक्षक अंकिता शर्मा आणि खैरागडचे पोलीस अधिक्षक लक्ष्य शर्मा यांनी पोहोचून शोधमोहिम अधिक जोमाने सुरू केली आहे. जंगलात गुप्तपणे लपलेले माओवादी आता पोलिसांच्या शोधात आहेत.

आशिष शर्मा – वीरता आणि कर्तृत्व -
आशिष शर्मा (४०), मध्यप्रदेशातील नरसिंहपुर जिल्ह्यातील गाडरवारा तालुक्यातील बोहानी येथील रहिवासी होते. त्यांनी २०१६ मध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून सेवेत रुजू होऊन वीरता पदक दोन वेळा प्राप्त केले होते. त्यांची शौर्यगाथा विशेषतः फेब्रुवारी २०२५ मध्ये बालाघाट जिल्ह्यातील रोंढा जंगलात माओवादी चकमकीत मोठी ठरली, जिथे त्यांनी तीन महिला माओवाद्यांना ठार केले होते. आशिष शर्मा यांच्या वैयक्तिक जीवनातील महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्यांचे येत्या जानेवारी महिन्यात विवाह होणार होता.

मुख्यमंत्र्यांची शोकसंवेदना -
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांच्या शहादतीवर शोक व्यक्त करत, त्यांचे बलिदान नक्षलवादाच्या निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही उभे आहोत, असे म्हटले. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाची कदर देशभरात केली जात आहे.





  Print






News - Gondia




Related Photos