मानखुर्द-शिवाजीनगर प्रभाग आरक्षणावर स्थानिकांचा विरोध : पुनरावलोकनाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावर मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील रहिवासी आणि नागरी संघटनांनी विरोध केला आहे. प्रभाग क्रमांक १३५, १३६, १३७ आणि १३८ मध्ये थेट ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे, पण स्थानिकांचे म्हणणे आहे की, या प्रभागांची रचना लोकसंख्येशी विसंगत आहे.
यावर नागरिकांनी राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकारच्या नगरविकास विभाग आणि महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात सात प्रभाग आहेत. सामान्यतः लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण निश्चित केले जाते, मात्र या प्रभागांमध्ये सर्वसाधारण (खुला) गट आणि मुस्लिम (अल्पसंख्याक) लोकसंख्या जास्त आहे. तरीही, सलग चार प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे.
गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष ॲड. फैजल आलम शेख यांचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या आरक्षणामुळे निवडणुकीनंतर महापौरपदावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे, प्रशासनाने तातडीने आरक्षणाची पुनरावलोकन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी.
प्रमुख मागण्या -
१. एम पूर्व विभागातील प्रभाग आरक्षणाची तातडीने पुनर्पडताळणी करावी.
२. लोकसंख्येच्या अद्ययावत आकडेवारीवर आधारित सुधारित आरक्षण यादी जाहीर करावी.
३. लॉटरी प्रक्रियेतील त्रुटी, हस्तक्षेप किंवा राजकीय दबाव याबाबत स्वतंत्र चौकशी करावी.
४. २८ नोव्हेंबरपूर्वी प्रभागात न्याय्य आरक्षण लागू करावे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनास तातडीने या आरक्षणात सुधारणा करावी, असे सांगितले आहे, कारण यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
News - Rajy




Petrol Price




