महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून कॅन्सरग्रस्त रुग्णाला मिळाला मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील होसारा टोली (ता. तुमसर) येथील शालिनी अजय वासनिक यांना मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशाने आणि जिल्हा कक्षाच्या पुढाकारण आर्थिक मदत मिळाली आहे.

वासनिक यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर गेटवेल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर केमोथेरपी आणि रेडिएशन उपचार करणे आवश्यक होते. या उपचारांचा एकूण खर्च सुमारे दीड लाख रुपये अपेक्षित होता. मात्र, रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हा खर्च उचलणे त्यांना शक्य नव्हते.

अशा परिस्थितीत रुग्णाची मुलगी आलिशा हिने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हा मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे मदतीसाठी अर्ज केला होता. संबंधित कक्षाने त्वरित कार्यवाही करून अर्ज पुढील प्रक्रियेसाठी राज्य कक्षाकडे पाठविला. त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाने आणि कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्या पाठपुराव्याने रुगाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.

या मदतीमुळे रुग्णाच्या उपचाराचा मोठा आर्थिक भार हलका झाला, त्यातून वेळेत उपचार करता आल्याचे समाधान नातेवाईकांनी व्यक्त केले.





  Print






News - Wardha




Related Photos