महत्वाच्या बातम्या

 ट्रक-ऑटोची भीषण धडक : आठ जणांचा मृत्यू, सहा जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पाटणा (बिहार) : पाटणा जिल्ह्यातील दनियावा येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. नालंदा जिल्ह्यातील रेरी मलमा गावातील हे सर्वजण गंगा स्नानासाठी फतुहा येथे ऑटोने जात असताना अल्ट्राटेक फॅक्टरीजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या ऑटोला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की ऑटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

या धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. सहा जणांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना पाटणा येथे हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून फरार ट्रकचालकाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.





  Print






News - World




Related Photos