महत्वाच्या बातम्या

 शासकीय कार्यालयात १ जानेवारी २०२३ पासून हेल्मेट सक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

 प्रतिनिधी /भंडारा : जिल्ह्यातील रस्ता अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचारी/अधिकारी व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना १ जानेवारी २०२३ पासून हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कळविले आहे. सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी/अधिकारी व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दुचाकीवरून प्रवास करतांना हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याची जाणीव करून द्यावी. शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी पोलीस व परिवहन विभागातर्फे हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करून मोटार वाहन कायद्यातंर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.





  Print






News - Bhandara




Related Photos