जमीन धसणे म्हणजे काय ?


कोट्यवधी बोअरवेल द्वारा दररोज फार मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा होत असल्याने जमिनीतील भूजल कमी होत आहे, या कारणामुळे भुगर्भ शुष्क, कोरडे व ठिसूळ होत आहे,ज्याचा परिणाम म्हणजेच जमीन धसणे.
जमीन धसण्याचा धोका आता महानगरांमध्ये जाणवू लागला आहे. शहरांमधे भूपृष्ठावर टोलेजंग इमारती आणि फार मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा व शुष्क कोरडा होत चाललेला भूगर्भ म्हणजेच महानगरांसाठी धोक्याची घंटा आहे. भविष्यात हे दुर्दैवी प्रकार वाढतच जाणार आहेत अशी भीती वाटते.
आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. ज्या धरणीवर आपण निश्चिंत राहतोय त्या जमिनीसाठी आपणच धोका उत्पन्न करीत आहोत.
अजूनही वेळ गेलेली नाही वाहून जाणारे जास्तीत जास्त पावसाचे पाणी खोल जमिनीत साठवता येईल व भूजल पातळी वाढवता येईल आणि जमीन धसण्याचा धोका टळेल. आपल्या गावातील प्रत्येक विहीर व बोअरवेल साठी रिचार्ज प्रक्रिया पूर्ण करावी ही काळाची गरज आहे.
सुहास सोहोनी, जलक्रांती अभियान
९४०५३४९३५४
News - Editorial




Petrol Price




