महत्वाच्या बातम्या

 २७ डिसेंबर ला एमसीव्हिसी अभ्यासक्रमातील शिक्षकांचे नागपूरात धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (जुने नाव एमसीव्हिसी) सुरु असून या अभ्यासक्रमातील शिक्षक व विद्यार्थ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान २७ डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात यावेत व नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत सुधारणा विनाविलंब करण्यात याव्या, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील रिक्त पदे भरण्यास तात्काळ परवानगी देण्यात यावी. रिक्क पदे भरण्याची परवानगी मिळेपर्यंत तासिका तत्वावरील शिक्षकांनीची पदे भरण्यासाठी मान्यता द्यावी, आयटीआय किंवा पोलिटेक्निक च्या धर्तीवर तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढवावे,
४२ दिवसाच्या संपकालिन रजा शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी कार्यवाही तात्काळ करावी. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यावर आयटीआय प्रमाणे शिकाऊ उमेदवारी योजना लागू करण्यात यावी व त्याची अंमलबजावणी बी.टी. आर. आय. कडून करण्यात यावी, विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय सेवेतील योग्य पदांच्या सेवाप्रवेश नियमावलीत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश करावा आदी मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन होणार आहे.
राज्यातील कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या या अभ्यासक्रमाकडे शासनाने दुर्लक्ष न करता तात्काळ मागण्या मंजूर करण्याची मागणी व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयंत भाभे, सचिव प्रकाश तराळे, कार्याध्यक्ष संजय विसपुते, प्रशांत आडमुठे, गणेश टर्ले, बाळकृष्ण सुर्वे, दत्तात्रय नाईक आद पदाधिकाऱ्यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos