महत्वाच्या बातम्या

 लोकबिरादरी प्रकल्पात समर्पित बिरादरी विशेषांकाचे प्रकाशन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाचा आज २३ डिसेंबर रोजी ४९ वा वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधून सुप्रसिध्द समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे व डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांचे हस्ते समर्पित बिरादरी या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी सुरत (गुजरात) येथील स्टील प्लांटचे जनरल मॅनेजर संजय रामटेके, रेखा रामटेके, नागपूर येथील माईल्स मॅनेजर देवेंद्र रंगारी, वंदना रंगारी, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लोकबिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समर्पित बिरादरी या डिजिटल विशेषांकाचे हे तिसरे वर्ष असून यापूर्वी दोन अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. दोन अंकाला वाचकांच्या प्रतिक्रियावरुन उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यावर्षी तिसरा अंक प्रकाशित केला. सदर अंकात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले निवडक लेख, कथा, कविता, अनुभव, चित्रे यांचा समावेश आहे. विशेषांकाचे संपादक अनिकेत आमटे आहेत. मुखपृष्ठ मांडणी, व्यवस्थापक व अक्षररचना दिपक सुतार यांची आहे. लेख संकलन व निवड करण्यासाठी सात जणांचे संपादक मंडळ आहे. सदर विशेषांक वाचणीय असून वाचकांनी लोकबिरादरी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर भेट देऊन अंक वाचून प्रतिक्रिया कळवाव्यात असे आवाहन अनिकेत आमटे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos