महत्वाच्या बातम्या

 पारडी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


- मेळाव्यातून युवकांना  रोजगाराच्या संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर आणि टाटा स्ट्राईव स्किल सेंटर, पारडी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा म्हणजेच प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पारडी येथील प्रजापती नगर मेट्रो स्टेशनजवळील टाटा स्ट्राईव स्किल सेंटर येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात क्वेस्ट कॉर्प., सायबरथॉन, नुबिनो, टीमलीज, आरोदया मोटर्स, फिश टेक सोल्युशन्स यांसारख्या नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. 

या कंपन्यांमार्फत २४० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा धारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच, कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

युवक, युवती व विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री अवथरे यांनी केले आहे. 





  Print






Related Photos