महत्वाच्या बातम्या

 जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात भगवंतराव हायस्कूल बोटेकसाचे यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड यांच्या वतीने कर्मवीर विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय वासाळा ता. आरमोरी येथे चार दिवसीय स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यात शेकोटी कार्यक्रमात नृत्य स्पर्धा, प्रथमोपचार स्पर्धा, आर्टिस्ट स्पर्धा, बुक बॉइडींग स्पर्धा, बास्केट स्पर्धा, स्वच्छता अभियान, आनंद मेळावा, बिन भांड्यांचा स्वयंपाक स्पर्धा, ठानेगाव जवळील हेमाळपंथी मंदिरात सहल, तसेच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. स्काऊट गाईड ला देण्यात येणारे हे शिक्षण चाकोरी बाहेरील व निसर्ग निवासी शिबिराचा आनंद देणारी शिक्षण पद्धती आहे. 

वासाळा येथे घेण्यात आलेल्या चार दिवसीय स्काऊट गाईड मेळाव्यात भगवंतराव हायस्कूल बोटेकसा येथील स्काऊट पथक व गाईड पथक यांनी भाग घेतला. वरील घेण्यात आलेल्या शेकोटी कार्यक्रमातील नृत्य स्पर्धेत लोकनृत्य सादर करून जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला. स्काऊट पथकाने बिन भांड्यांचा स्वयंपाक या स्पर्धेत 45 मिनिटात 30 प्रकारच्या भाज्या व पदार्थ तयार करून जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक पटकाविला. तसेच प्राविण्य पदक आर्टिस्ट स्पर्धेत वर्ग नववी मध्ये शिकत असलेला अरुण फुल्लुराम कुमरे याने दिलेल्या वेळेत झुंबर बनवून तृतीय क्रमांक मिळविला. यासाठी स्काऊट शिक्षक नामदेव नागपुरे, गाईड शिक्षिका सविता चंदनखेडे यांनी तसेच शाळेतील शिक्षक लालचंद जनबंधू, रमेश कडते, राजेंद्र म्हस्के, रवी शिवणकर शिक्षकेत्तर कर्मचारी हरिराम तेलासी, सतीश चन्नावार यांनी अथक परिश्रम केले. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सदस्या तथा जिल्हा गाईड आयुक्त लीना हकीम तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा जिल्हा स्काऊट आयुक्त समशेरखान पठाण यांनी स्काऊट गाईड संघाचे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos