दहशतवाद्यांनी केलेल्या एलईडी हल्ल्यात आसाम रायफलचे ३ जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मणिपूर :
भारताच्या म्यानमारजवळील सीमेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या एलईडी हल्ल्यात ४ आसाम रायफलचे ३ जवान शहीद झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात इतर ४ जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
हा दहशतवादी हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी आसाम राफल जवानांवर गोळीबार सुरू केला. इंफाळपासून सुमारे १०० किमीच्या अंतरावर असलेल्या चंदेल जिल्ह्यात हा हल्ला झाला. हा सर्व पर्वतीय परिसर आहे. भारतीय लष्कराकडून या भागात अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या बरोबरच भारत आणि म्यानमार सीमेवर देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चंदेल जिल्ह्यातच आसाम रायफल्सच्या छावणीवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. लष्कराच्या छावणीत अतिरेक्यांनी बॉम्ब फेकले होते. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यानंतर अतिरेकी जवळच्या डोंगरावर पळून गेले. या हल्ल्यात सैन्यातील कोणताही जवान शहीद झाला नव्हता.
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील पीएलएच्या अतिरेक्यांनी आज सकाळी सैनिकांवर हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी या भागात प्रथम आयईडीचा स्फोट घडवून आणला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केला. इम्फाळपासून सुमारे १०० किमीच्या अंतरवार असललेल्या घटनास्थळी मोठ्या संख्येने जवान पाठविण्यात आले आहेत.
  Print


News - World | Posted : 2020-07-30


Related Photos