महत्वाच्या बातम्या

 माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचेकडे जुन्या रेपणपल्ली येथील गावकऱ्यांनी दिले निवेदन


- जुनी रेपणपल्ली असे नाव देण्यात यावे असे निवेदन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : ग्रा. प. रेपणपल्ली अंतर्गत येत असलेल्या सगळ्यात जुनी वस्ती असलेल्या (जुनी) रेपणपल्ली येथील गावकऱ्यांच्या अर्जा नुसार 16 सप्टेंबर 2022 रोजी ग्रामसभा घेतले असता मौजा (जुनी) रेपणपल्ली हे गाव वेगळ्या करण्यास ग्रामसभामध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले. माजी जी. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मौजा (जुनी) रेपणपल्ली हे गाव घोषित करण्यास सर्व गावकऱ्यांनी मिळून अध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गावातील माजी प. स. सभापती सौ.सुरेखा आलाम, मोबीन सडमेक, राकेश सडमेक, कैलास सिडाम, अविनाश कोडापे, सुनील येलाम, गुलाब येलाम, बापू सिडाम, सत्यम आत्राम, दौलत आलाम, दिलीप कोडापे, नरेश सिडाम उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos