सकाळ गौरवगाथा – प्राइड ऑफ विदर्भ मध्ये विदर्भातील कर्तृत्वाचा गौरव


- नितीन गडकरींच्या उपस्थितीत नागपुरात गौरव सोहळा; हर्षवर्धन बाबा आत्राम, डॉ.मिताली आत्राम यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : विदर्भाच्या मातीत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाची अमीट छाप उमटविणाऱ्या गुणवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा सकाळ गौरवगाथा प्राइड ऑफ विदर्भ हा दिमाखदार सोहळा रविवारी नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित या शानदार सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या सोहळ्यास युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच डॉ. मिताली हर्षवर्धन आत्राम (भालवी) यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे गडचिरोली-अहेरी परिसरासाठी हा गौरव सोहळा विशेष अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.
सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण, उद्योग, प्रशासन यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आपल्या कार्यातून समाजाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या, अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने विदर्भाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला.
विदर्भाच्या विकासात आणि सामाजिक जडणघडणीत विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. अशा व्यक्तींच्या कार्याला समाजासमोर आणून त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचे सकाळ गौरवगाथा प्राइड ऑफ विदर्भ हे व्यासपीठ निश्चितच कौतुकास्पद ठरले. या उपक्रमातून कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीने सोहळ्याची प्रतिष्ठा आणखी उंचावली. विदर्भातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या योगदानाला मानाची पावती देणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.प्राइड ऑफ विदर्भ हा केवळ गौरव सोहळा नसून विदर्भाच्या कर्तृत्वाला, जिद्दीला, प्रतिभेला आणि सामाजिक बांधिलकीला मनापासून दिलेली कौतुकाची थाप ठरली.




Petrol Price




