आष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  आष्टी :
शहरात आलापल्ली मार्गावर दुकान बंद करून दुचाकीने जात असलेल्या व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल २ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे.  
 येथील अनिल पान मटेरियल चे मालक श्रीनिवास राघमवार हे आपले दूकान बंद  करुण नेहमी प्रमाणे गोडाउन कड़े जात असताना रात्री ८.३०  वाजता आलापल्ली मार्गावरील ग्रामीण रुग्णालयाच्या समोर दबा धरून बसलेल्या दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकिला मागून ठोस मारली.  त्यामुळे राघमवार यांनी कोण आहे म्हणून मागे फिरले असता त्यांची पैशाची बॅग हिसकाविण्याचा आरोपी प्रयत्न लागले आणि एकाने तोंडावर स्प्रे मारला.  त्यामुळे त्यांना इजा झाली. राघमवार हे  वेदनेने खाली पडले आणि जोरात ओरडू लागले . त्यामुळे आरोपी  आलापल्ली मार्गाने  पळून गेले.  यावेळी काही नागरिकांनी पाठलाग केला पण ते  सापडले नाही.  त्यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटला पट्टी चिटकवून होती.  त्यामुळे नंबर सुध्दा मिळू शकला नाही.  श्रीनिवास राघमवार याना तात्काळ उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .  राघमवार यांनी दाखविलेल्या हिमतीमुळे   मोठी  घटना होता होता ठळली . त्यामुळे आष्टी मधील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-03


Related Photos