घोट वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल व वनरक्षक व रोजंदारी वनमजूर अडकले एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोट वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या घोट उपक्षेत्रातील वनपाल लक्ष्मण व्यंकटी गंजीवार (५७), घोट नियतक्षेत्रातील वनरक्षक नागोजी रावजी सिडाम (५१) व रोजंदारी मजूर खाजगी इसम रुपेश वसंत चलाख यांना १० हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, २३ जून रोजी रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळै लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यातील तक्रारदार हा घोट येथील रहिवासी असून वनक्षेत्राच्या नाल्यातून रेती वाहतूक करताना पकडलेल्या रेतीच्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता सोडण्याच्या कामाकरिता वनपल गंजीवार, वनरक्षक सिडाम व रोजंदारी मजूर रुपेश चलाख यांनी तक्रारदारास ५० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील आज, २३ जून रोजी सापळा रचून लाच रक्कमेचा एक हफ्ता १० हजार रुपये स्वीकारताना सदर तीनही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, पोलिस हवालदार नथ्थू धोटे, पोलिस नाईक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई गणेश वासेकर, किशोर ठाकूर, चालक पोलिस नाईक तुळशीराम नवघरे यांनी केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-23


Related Photos