अहेरी शहरातील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग


- जिल्हयातील एकुण बाधित संख्या झाली ५४ तर आत्तापर्यंत ४२ जणांना डिस्चार्ज 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी तालुक्यातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ११ झाली.   तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ५४ झाली तर आत्तापर्यंत ४२ जणांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाला आहे . अहेरी शहरातील ४५ वर्षीय व्यक्तिला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन प्रतिबंधात्मक क्षेत्र लावणे व सदर व्यकीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे याबाबत कार्यवाही सुरु  आहे. उर्वरीत तपशील काही वेळानंतर प्रशासनाकडून देन्यात  येतील व कोणीही रुग्णांची ओळख पटेल असे संदेश सार्वत्रिक करू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-19


Related Photos