महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३० ऑगस्ट महत्वाच्या घटना

१५७४ : गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.Holidays & Seasonal Events

१८३५ : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.

१८३५ : अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.

१९४५ : दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.

१९७९ : सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.

३० ऑगस्ट जन्म

१७२० : व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७९६)

१८१२ : ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८६९)Time & Calendars

१८१३ : बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)

१८५० : प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३)

१८७१ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३७)

१८८३ : योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ – मुंबई)

१९०३ : हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८१)

१९०४ : उद्योगपती नवल होर्मुसजी टाटा यांचा जन्म.

१९२३ : हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६)

१९३० : संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)

१९३० : अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.

१९३४ : लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)

१९३७ : मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)

१९५४ : बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.

१९५४ : भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.

१९६० : अमेरिकन सार्जंट, मेडल ऑफ ऑनर विजेते गॅरी गॉर्डन यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९९३)

१९२६ : अमेरिकन पोलीस अधिकारी, D.A.R.E. कार्यक्रमाचे निर्माते डॅरिल गेट्स यांचा जन्म (मृत्यू : १६ एप्रिल २०१०)

१८९९ : बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म (मृत्यू : २२ सप्टेंबर १९७०)

१८५३ : डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचा जन्म (मृत्यू : २९ जुलै १८९०)

३० ऑगस्ट मृत्यू

१७७३ : सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)Astronomy

१९४० : इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६)

१९४७ : मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)

१९८१ : शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)

१९९४ : प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)

१९९८ : स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)

२००३ : अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)Language Resources

२०१४ : भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८

२०१५ : भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)

२०२२ : सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष - नोबेल पुरस्कार विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन (जन्म: २ मार्च १९३१)

१९९४ : प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक शंकर गोपाळ तुळपुळे यांचे निधन (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)

१९८९ : संपादक वव साहित्यिक ग. वा. बेहेरे यांचे निधन (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

१९८१ : रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचे निधन (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)Time & Calendars

१९७६ : चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

१९६९ : कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन (जन्म: २६ जुलै १८९४)

१९५७ : ऑस्ट्रेलियन नेव्हिगेटर आणि विली पोस्ट यांच्यासोबत सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती हॅरोल्ड गॅटी यांचे निधन (जन्म: ५ जानेवारी १९०३)

१९४० : इलेक्ट्रॉनचे शोधाक इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार विजेते सर जे. जे. थॉमसन यांचे निधन (जन्म: १८ डिसेंबर १८५६)

१९०६ : स्विस-ऑस्ट्रियन वास्तुविशारद, स्वित्झर्लंडच्या फेडरल पॅलेसचे रचनाकार हंस ऑअर यांचे निधन (जन्म: २६ एप्रिल १८४७)

१७७३ : मराठा साम्राज्याचे ५वे पेशवा नारायणराव पेशवा यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १७५५)





  Print






Related Photos